Skip to main content

UPSC | MPSC | PSI | STI स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ


२० वर्षाच्या अखंड चिंतनातुन निर्माण झालेला संदर्भग्रंथ 'आधुनिक भारताचा इतिहास'


पुस्तकाची वैशिष्ट्ये

  • १३ परिशिष्टे
  • २३ नकाशे
  • ३५ प्रकरणे
  • ११४ संदर्भचित्रे
  • ४२५ व्यक्तिचित्रांसह


प्रस्तावना


आधुनिक भारताचा इतिहास एका नव्या धाटणीने लिहून ग्रथित केल्या बद्दल श्री. सुजित धर्मपात्रे यांचं मनःपूर्वक अभिनंदन. कवी गोविंदाग्रजांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या योगदानाविषयी व त्यांच्या स्वातंत्र्यविषयीच्या भावनांविषयी लिहिलं आहे

'जे जे नश्वर गेले निघुनी काळाच्या पाठी।
अमृत तेवढे उरले केवळ या दिवसासाठी||
अंधाराची वाट कंठिली फिरलो संकष्टी।
चार युगांची रात्र भोगिली या दिवसासाठी|| '

-श्री . विश्वास नांगरे पाटील (IPS)

व्याख्याना साठी संपर्क


प्रिय वाचक-मित्र ,
आपण 'आधुनिक भारताचा इतिहास -सुजित धर्मपात्रे ' या पुस्तक विषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व अभिप्राय व्हाट्सऍप नंबर ८४५९०३१०५३ किंवा इ-मेल sbdharmpatre@gmail.com वर पाठवावेत, ही विनंती.

-सुजित धर्मपात्रे

शुभेच्छा पत्र


श्री. सुजित धर्मपात्रे यांच्या लेखनातील मराठी भाषेचा दर्जा, ओघवती व सहजतेने समजणारी भाषाशैली मूल्यांकनातील निःपक्षपातीपणा, कमी शब्दात अधिक आशय समजावणारी शब्दरचना, विविध पैलूंनी इतिहासाचा घेतलेला आढावा यांमुळे या पुस्तकाचं लिखाण दर्जेदार झालं आहे. स्पर्धा परीक्षा परीक्षार्थीसाठी तर हे पुस्तक उपयुक्त आहेच परंतु सर्व भारतीय नागरिकांनी हा इतिहास समजावून घ्यावा, ही अपेक्षा.

प्रस्तावना -श्री. विश्वास नांगरे पाटील (IPS)


श्री सुजित धर्मपात्रे यांचे हे पुस्तक मार्गदर्शक पुस्तकांच्या खजिन्यातील एक देखणा अलंकारच आहे.

आशीर्वचन- श्री.अरविंद इनामदार, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य


मराठी भाषेतील आधुनिक भारताच्या इतिहासच्या दर्जेदार व समीक्षात्मक संदर्भग्रंथांची उणीव या पुस्तकाने दूर केली आहे. मराठी भाषिक स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास आहे.

- श्री.प्रवीण दराडे (IAS)


प्रत्येक भारतीय नागरिकाने सुजित धर्मपात्रे लिखित 'आधुनिक भारताचा इतिहास ' या पुस्तकातून हा इतिहास समजावून घेणे आवश्यक आहे. भारतीय नागरिकांच्या या ज्ञानातूनच सर्वसमावेशक समाजाची उभारणी होणे शक्य आहे. यातूनच विश्वामध्ये समर्थ भारताची प्रतिष्ठा वाढेल व प्राचीन काळापासून विश्वशांतीचा संदेश देणारा भारत जगाचे अध्यात्मिक नेतृत्व करू शकेल.

- डॉ.रघुनाथ माशेलकर


यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. च्या अभ्यासक्रमाला अनुसरून श्री सुजित धर्मपात्रे यांनी केलेले इतिहासाचे चिंतन व समीक्षात्मक पद्धतीने इतिहासाची केलेली मांडणी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासास अतिशय उपयुक्त अशी आहे. दर्जात्मकरित्या लिखित केलेले हे पुस्तक स्पर्धा परीक्षा व पदवी अभ्यासक्रमासाठी विध्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.

-श्री. तुकाराम मुंडे (IAS)


यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठी भाषिक विध्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ असे इतिहासाचे दर्जेदार पुस्तक मराठीत उपलब्ध नाही. भाषांतर करण्यात किंवा उपलब्ध संदर्भग्रंथांचा अभ्यास करण्यात त्यांचा बराचसा वेळ जातो . या मराठी विध्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सुजित धर्मपात्रे यांनी हा संदर्भग्रंथ लिहिला आहे.

-श्री . महेश भागवत(IPS)


भारतीय नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी,अभ्यासू व्यक्तींनी या पुस्तकाचा लाभ आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी तसेच जागरूक भारतीय नागरिक म्हणून आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी करावा, ही अपेक्षा .

-डॉ विजय भटकर


आधुनिक भारताचा इतिहास हे दर्जेदार व समीक्षात्मक पद्धतीने लिखाण केलेले पुस्तक ग्रामीण भागातील व मराठी माध्यमातून यु.पी.एस.सी. व एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांकरिता तयारी करण्याऱ्या परीक्षार्थींना उपयुक्त ठरेल. या पुस्तकाचा अभ्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यात महत्वाची भूमिका बजावील.

-श्री . किरण गित्ते (IAS)


इतिहासात घडलेल्या घटनांचे नि:पक्षपणे परीक्षण करणे व वास्तुनिष्ठेला प्राधान्य देऊन तत्कालीन इतिहास तटस्थतेने मांडणे , ही श्री . सुजित धर्मपात्रे यांनी स्वीकारलेली समीक्षा पद्धती स्पर्धात्मक व पदवी परीक्षार्थींना अत्यंत उपयुक्त अशी आहे.भारतीय नागरिकांनी, स्पर्धा परीक्षार्थींनी, वाचकांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा, हि अपेक्षा .

-डॉ सुहास वारके (IPS)


इतिहासाचा अभ्यास व त्यातून मिळणारी प्रेरणा हि भविष्याच्या वाटचालीसाठी दीपस्तंभ म्हणून कार्य करते . भारताचे भारतीय स्वतंत्रलढ्याचा इतिहास भावी पिढ्यांना मार्गदर्शक तर आहेच , परंतु राज्यकर्त्यांना , प्रशासनिक अधिकाऱ्यांना आपल्या योजना आखण्यासाठी , कार्यान्वित करण्यासाठी दिशा देणारा आहे .

-श्री . आण्णा हजारे

आमच्याशी संपर्क साधा